पार्टीसाठी आलेल्या मैत्रिणीवर मित्रानेच केला बलात्कार; पुण्यातील संतापजनक घटना

पुणे – पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये एका पार्टीदरम्यान २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या सात ते आठ मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पार्टीनंतर बलात्काराची ही घटना घडलीआहे. बलात्कार करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन घरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान २४ वर्षीय स्वप्निल ठाणगे या आरोपींने आपल्या २० वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटनेमुळे वारजे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मूळचा दौंड येथील राहिवाशी असलेल्या स्वप्निलला पोलिसांनी अटक केली आहे.नशेच्या धुंदीत असलेल्या स्वप्निलने गॅलरीमध्ये पहाटेच्या सुमारास या तरुणीवर बलात्कार केला.