तुळजापुरात महागाई विरोधात युवासेनेचे थाळी बजाव आंदोलन

तुळजापूर – महागाई विरोधात युवासेनेने ( Yuvasena )आक्रमक होत पेट्रोल पंपावर याळी बजाव आंदोलन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची खिल्ली उडवली. युवासेना तुळजापूर ( Tuljapur ) तालुकाच्या वतीने तुळजापूर शहरातील भारत पेट्रोल पंप येथे युवासेनेने हे थाळीनाद आंदोलन केले.

केंद्र सरकारने सत्तेवर येण्याअगोदर जनतेला महागाई कमी करण्यासंदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु सध्या केंद्र सरकारला याचा विसर पडलेला आहे. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचाचा कयास लावला होता. त्याप्रमाणे थाळी वाजवल्या नंतर तरी कमी मोदी साहेबांना महागाई पळवून लावण्याची सद्बुद्धी लाभावी यासाठी व केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाईचे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, शहर प्रमुख सुधीर कदम, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखन परमेश्वर, शिवसेना उपशहरप्रमुख प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, दिनेश रसाळ , शहरप्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना विभाग प्रमुख बालाजी पांचाळ, सोशल मीडिया विभाग प्रमुख महादेव पवार, प्रेम कदम, प्रसाद रोचकरी, निरंजन इंगळे आदी शिवसैनिक युवासेनेचे कार्यकते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.