“मी ठाकरेंचा मिंदा नाही, उलट माझ्यामुळे आदित्यचं नाव झालं”, अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य चर्चेत

Abhijeet Bichukle: आपल्या निर्भीड आणि स्पष्ट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले राजकारणी अभिजीत बिचुकले हे आता अवधुत गुप्तेंच्या (Avadhoot Gupte) खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या आगामी भागाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यात अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) विरुद्ध त्यांनी लढवलेल्या परळी विधानसभा निवडणुकीबद्दक भाष्य करताना दिसत आहेत.

अभिजीत बिचुकले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्याचबरोबर अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या पक्षातून फॉर्म भरले. अभिजीत बिचुकले यांना जिंकायचं नसतं तर फक्त चर्चेत राहायचं असतं असं लोक म्हणतात,” असं अवधूत गुप्ते म्हणाल्यावर अभिजीत बिचुकले म्हणाले, “मला जर चर्चेत राहायचं असेल तर तुम्ही जा, तुम्ही चर्चेत राहा. तुमच्यात काही दम नाही का? उद्धव दादांचे आणि माझे चांगले संबंध आहेत म्हणून…”

त्यावर अवधूतने त्यांना विचारलं की, “उद्धव ठाकरे आणि तुमचे चांगले संबंध असूनही तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणुकीला का उभे राहिलात?” त्यावर अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, “मी लोकशाहीने गेलो. मी त्यांचा मिंदा नाही. गंमत अशी झाली की काही अंशी त्या ठिकाणी माझ्यामुळे आदित्यचं जास्त नाव झालं.”

महत्त्वाच्या बातम्याः

‘देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे’

वनडे विश्वचषकानंतर राहुल द्रविड सोडू शकतात प्रशिक्षकपद, बीसीसीआयला शोधावा लागणार नवा गुरू

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार