विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या ७ आमदारांची दांडी

Mumbai – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. (Rahul Narvekar finally becomes the Speaker of the Maharashtra Legislative Assembly) विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi)  मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली.

ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) ठरले आहेत. शिरगणती (Head count) केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.

दरम्यान, रविवारी झालेल्या निवडीच्या दरम्यान 12 आमदारांची अनुपस्थिती होती. यामध्ये सर्वाधिक संख्या ही (Rashtrawadi Party) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आमदारांची आहे. तर भाजपाचे लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) ह्या आजारी असल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत. तर शिंदे गटाचे आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांनी या अध्यक्षपदाच्या निवडीला हजेरी लावली होती.

राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजारी किंवा परदेशात असणाऱ्या आमदारांनीही हजेरी लावली होती पण अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान 12 आमदार उपस्थित राहू शकले नाहीत. यामध्ये सर्वाधिक 7 आमदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) होते. यामध्ये नवाब मलिक, अनिल देशमुख, दत्ता भरणे,निलेश लंके, संजय बनसोडे, दिलीप मोहिते, बबन शिंदे यांचा समावेश होता तर भाजपाच्या मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे व रणजित कांबळे हे अनुपस्थित होते. तर एमआयएमचे मुफ्ती इस्माइल शाह (Ismail Shah) हे देखील उपस्थित राहू शकले नव्हते.