Raju Shetti | राजू शेट्टी यांची वाट बिकट; ठाकरेंनी आणले अडचणीत

Raju Shetti | महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (Mavikas Aghadi) (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची बुधवारी घोषणा केली. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी कल्याण, जळगाव, पालघर आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली.

जळगावचे भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांच्यासह करण पवार आणि इतरांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरेंनी उमेदवारांची घोषणा केली.हातकंणगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांना ठाकरे पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. मात्र, शेट्टी आणि ठाकरे यांची चर्चा अयशस्वी झाल्यावर ठाकरे यांनी शेट्टी यांच्याविरोधात सेनेचा उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढून लोकसभा निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकू; असा विश्वास राजू शेट्टी यांनी बुधवारी सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. शिवसेनेने कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजप विरोधातील मताची विभागणी होऊ नये यासाठी माझे ठाकरे यांच्याकडे प्रयत्न सुरू होते. आता त्यांनी उमेदवार दिला असला तरी आम्हाला आमची लढाई लढावी लागणार आहे असे ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत