Amit Patkar | ‘गुप्तचर अहवालात काँग्रेसचा दक्षिणेत विजय आणि उत्तरेत 50-50 जिंकण्याचा अंदाज स्पष्ट झाल्याने भाजप बिथरला’

Amit Patkar – गोव्यात काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आणि दोन्ही जागा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिणेत काँग्रेस विजयी होणारच आणि उत्तर गोव्यात 50-50 जिंकण्याची अंदाज गुप्तचर अहवालात स्पष्ट झाल्याने भाजप बिथरला आहे. उत्तरेतही आम्हीच जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता आणि हळदोणचे आमदार कार्लोस फरेरा यांच्या उपस्थितीत ते काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते.

कॉंग्रेस नेते महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल आणि आपले गोमंतकीय पुरूषोत्तम काकोडकर आणि इतरांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि गोवा मुक्ती चळवळीतील बलिदान आणि योगदानामुळेच डॉ. प्रमोद सावंत यांना स्वतंत्र भारत आणि मुक्त झालेल्या गोव्यात जन्माला आल्याचे सांगणे शक्य झाले आहे, असे सांगून अमित पाटकर यांनी भूतकाळातील काँग्रेस सरकारांनी साधलेल्या विविध विकास प्रकल्पांची लांबलचक यादी वाचून दाखवली.

स्वातंत्र्य चळवळ, रेल्वेचे राष्ट्रीयीकरण, पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ललित कला अकादमी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इतर अनेक उपक्रमांमध्ये सहभागाचा गौरवशाली इतिहास काँग्रेसचा आहे.

पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीने1952 मध्ये पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची स्थापना झाली ज्याने कोविड महामारीच्या काळात बहुमूल्य मदत केली असा दावा अमित पाटकर यांनी केला.हरितक्रांती, भारतातील पहिल्या संगणकाची स्थापना, गोव्याचा ओपिनियन पोल, बँकांचे राष्ट्रीयीकरण, श्वेतक्रांती, बांगलादेशची मुक्ती, भारताची पहिली अणुचाचणी, हे सर्व काँग्रेस सरकारच्या काळात घडले, असे अमित पाटकर म्हणाले.

मला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आठवण करुन द्यायची आहे की पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्ट 1975 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला, 1983 मध्ये गोव्यात चोगम रिट्रीट झाला, भारताने 1984 मध्ये पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांना अंतराळात पाठवले, माहिती तंत्रज्ञान क्रांती, गोव्याला घटकराज्याचा दर्जा, भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण काँग्रेस सरकारचे आणखी काही महत्वाचे टप्पे असल्याचे अमित पाटकर यांनी नमूद केले.

कोकणीला राजमान्यता, पंचायती आणि नगरपालिकांना अधिकार देणारी घटना दुरुस्ती, माहितीचा अधिकार कायदा, मनरेगा, चांद्रयानचा शुभारंभ, शिक्षणाचा अधिकार कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, मंगळ ऑर्बिटर मिशनची सुरुवात ही काँग्रेसच्या काळात झाली असे अमित पाटकर यांनी सांगीतले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

2015 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पक्षांतराला प्रोत्साहन देऊन भाजपने केलेल्या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध कॉंग्रेस लढत आहे. भारत जोडो यात्रा ही भारतातील प्रेम आणि एकता पसरवण्यासाठी होती आणि भारत जोडो न्याय यात्रा ही युवक, महिला, शेतकरी, उपेक्षित क्षेत्र आणि ओबीसी, एससी आणि एसटी यांना सक्षम करण्यासाठी आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर, भाजप सरकार विकसित भारत मोहिमेसारखे कोणतेही प्रचारात्मक कार्यक्रम आयोजीत करु शकत नाही. भाजपचे स्कार्फ व टोप्या यांचा वापर सरकारी कार्यक्रमात होवू शकत नाही. निवडणुक आयोगाने यावर त्वरित बंदी न घातल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा कार्लोस फरेरा यांनी दिला.

महिला सशक्तीकरणासाठी कॉंग्रेसनेच अनेक योजना व कायदे आणले. भारताची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची कॉंग्रेस पक्षानेच नेमणुक केली होती असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

NCP | अजितदादांचा धडाका; भारत राष्ट्र समितीला दिला दणका; मातब्बर नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

LokSabha Election 2024 | भाजपकडे शून्य, शून्य, शून्य आणि शून्यच राहणार; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ajit Pawar | अजित पवारांना गुर्मी, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली