Amol Kolhe | शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी करण्याचं काम सरकार करत आहे

Amol Kolhe : आजच्या बैठकीत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून ठामपणे आगामी निवडणुकीला समोरे जाणार आहे. सध्या देशातील आणि राज्यातील सत्ताधारी पक्षामध्ये भीतीचे वातावरण आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, विलिनीकरणाच्या बातम्या का पेरल्या जातात? हे आम्हाला माहित नाही. जर या बातम्या पेरल्या जात आहेत म्हणजेच शरद पवार साहेबांचा दरारा आणि जनमानसातली त्यांच्या संदर्भात असलेली प्रतिमा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे, असं म्हणायला हरकत नाही असे अमोल कोल्हे म्हणाले.

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही लवकरच जनतेपर्यंत आम्ही पोहचवू. आगामी होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून ठामपणे सामोरं जायचं आहे, यासंदर्भात चर्चा झाली. असेही अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे म्हणाले की, मुळात सत्ताधारी पक्षामध्ये जे भीतीचे वातावरण आहे. एका बाजुला भाजपा जर ४०० पार करणार असा दावा केला जात आहे तर, दुसऱ्या बाजुला बिहार, झारखंड आणि नुकतेच महाराष्ट्रात जे घडले. जर अब की बार ४०० पार म्हणत आहेत तर, या पद्धतीने पक्ष फोडण्याची, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची आणि काही पक्ष पळवण्याची गरज का पडली असती? ही साधी सरळ गोष्ट जनतेला माहिती आहे आणि हे जनतेपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे असेही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, ज्याप्रमाणे देशातील सरकार शेतकरी विरोधी सरकार अल्याचा चेहरा वारंवार समोर येत आहे. हे शेतकऱ्यांपासून लपून राहिलेला नाही आहे. दिल्लीच्या सीमेवर देखील ज्याप्रमाणे बॅरिकेट लावण्यात आले आहे. ज्याप्रमाणे अश्रूधूर आणि पाण्याच्या फवार्यांचा मारा करण्यात आला हा कुठेतरी एक रोष सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात आहे. एकीकडे केंद्र सरकार किसान सन्मान म्हणते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना असं प्रकारे वागत आहे. तशीच अवस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील आहे. कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या स्वप्नाची राख रांगोळी करण्याचं काम सरकार करत आहे. सर्व शेतकऱ्यांकडून हक्काची मागणी करण्यात येत असताना अशा प्रकारे त्यांच्यावर अश्रूधूर आणि पाण्याचा मारा होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य शेतकरी सरकारला धडा शिकवेल असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole