अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा वाद; अजित पवार चांगलेच भडकले

 पुणे – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर केलेला जातीयवादाचा आरोप किती अचूक आहे याचा नुकताच प्रत्यय सांगलीच्या सभेत आला आहे. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची चांगलीच नौटंकी पाहायला मिळाली. नौटंकी तर ते नेहमीच करतात मात्र यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांनी हिंदू परंपरांची (Hindu traditions) आणि पुरोहित (Priest) वर्गाची खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे एका समाजाची खिल्ली उडवली जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) स्टेजवर उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच भडकले. राजकीय व्यक्तींनी तारमत्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहीजेत असे पवार म्हणाले ते पुण्यात प्रसार माध्यमांशी (media) संवाद साधत होते. अजित पवार म्हणाले, ‘माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत. असं ते म्हणाले.