Atul Londhe | मतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर करणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा

Atul Londhe | मतांसाठी प्रभू रामाचा गैरवापर करणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींची उमेदवारी रद्द करा

Atul Londhe | भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

राज्य निवडणुक अधिकारी यांनी लिहलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, नितीन गडकरी यांनी प्रचार मोहिमेमध्ये धर्माचा आधार घेत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान श्रीराम दर्शविणारी पोस्टर्स वापरली गेली आहेत, ज्यामुळे निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. भाजपाचा हा प्रकार अनैतिक असून धार्मिक मतदारांचे ध्रुवीकरण करणारा आहे. भाजपाने या पोस्टर्सचा वापर काँग्रेस पक्षाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठीही केला गेला आहे. भाजपा व नितीन गडकरी यांनी केलेला प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन करणारा असून निवडणुक आयागाने तात्काळ त्यांची उमेदवारी रद्द करणे आणि भाजपवर योग्य दंड ठोठावण्यासह त्वरित कारवाई करावी.

भारतीय जनता पक्षाचे सर्व नियम धुडकावत असताना निवडणुक आयोग सत्ताधारी भाजपावर कसलीच कारवाई करत नाही. सरकारी यंत्रणा भाजपाच्या कठपुतळ्या बाहुल्या झाल्या आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेलिकॉप्टरची तपासणी केली पण भाजपा नेत्यांवर कारवाई करण्यास घाबरते यावरून निवडणुका पारदर्शी घेण्याच्या जबाबदारीपासून निवडणुक आयोगा दूर पळत असून केवळ विरोधकांसाठीच आचारसंहितेचे नियम आहेत का, असा संतप्त सवालही लोंढे यांनी विचारला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब

Total
0
Shares
Previous Post
Malaika Arora | मलायकाने ‘व्हर्जिनिटी’बाबत प्रश्न विचारताच मुलगा म्हणाला; “तू कधी…?”

Malaika Arora | मलायकाने ‘व्हर्जिनिटी’बाबत प्रश्न विचारताच मुलगा म्हणाला; “तू कधी…?”

Next Post
Atul Londhe | नवनीत राणांनी भाजपच्या फुग्यातली हवा काढली, ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

Atul Londhe | नवनीत राणांनी भाजपच्या फुग्यातली हवा काढली, ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

Related Posts
संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही; आदित्य ठाकरेंनी फक्त एकाच वाक्यात मनसेचा विषय संपवला 

संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही; आदित्य ठाकरेंनी फक्त एकाच वाक्यात मनसेचा विषय संपवला 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मनसे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले चढवले जात…
Read More
Godavari Electric Motors | गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन 'इब्‍लू फिओ एक्‍स' लाँच केली

Godavari Electric Motors | गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ लाँच केली

मुंबई | गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स ( Godavari Electric Motors) या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने…
Read More
Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, अवघ्या काही तासात मुख्य आरोपी ताब्यात

Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणातील सर्वात मोठी बातमी, अवघ्या काही तासात मुख्य आरोपी ताब्यात

Gangster Sharad Mohol murder – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (gangster Sharad Mohol) याची हत्या करण्यात आली आहे.…
Read More