लग्न करेन तर बागेश्वर बाबाशीच, MBBSच्या विद्यार्थीनीची भीष्म प्रतिज्ञा; गंगोत्रीवरुन निघाली पायी

Bageshwar Dham: आजकाल बागेश्वर धाम सरकारचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला लाखोंचा जनसमुदाय जमतो, जो पोलिस प्रशासनाला सांभाळणेही अवघड होऊन बसते. देश-विदेशात त्यांचे करोडो भक्त आहेत. तरुण पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत आवाज उठवत आहेत, ज्यासाठी ते अनेकदा चर्चेत असतात. दरम्यान, मुलींमध्येही त्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. एमबीबीएसची विद्यार्थिनी शिवरंजनी तिवारी हिने बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्नाच्या इच्छेने पदयात्रा सुरू केली आहे.

शिवरंजनी तिवारी (MBBS Student Shivranjani Tiwari) हिला पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्न करायचे आहे. या इच्छेने तिने डोक्यावर गंगाजलाचा कलश घेऊन गंगोत्री धाम ते बागेश्वर धाम अशी पदयात्रा सुरू केली आहे. शिवरंजनी तिवारी शनिवारी चित्रकूट येथील संतोषी आखाड्यात पोहोचली. चित्रकूटच्या संतांसमोर भजन गात असताना ऋषीमुनींकडून मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद घेतले.

धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे
शिवरंजनी तिवारीने सांगितले की, ती डोक्यावर गंगेच्या पाण्याचा कलश घेऊन पदयात्रा काढत आहे. याबाबत ती सध्या उघडपणे बोलत नाही, मात्र बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्न करण्याच्या इच्छेने ती हा प्रवास करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. शिवरंजनीला विचारले असता ती फक्त 16 तारखेची वाट पाहा असे सांगते. मात्र, तिच्या बोलण्यातून स्पष्ट अंदाज बांधता येतो, कारण एका ठिकाणी ती धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना प्राणनाथ म्हणतांना दिसते.

येत्या 16 तारखेला ती धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आपल्या मनातली गोष्ट सांगणार आहे. संतोषी आखाड्याचे महंत श्री रामजीदास महाराज यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, विवाह हा एक विधी आहे, मात्र शिवरंजनी तिवारी ही इच्छा घेऊन तीर्थयात्रेला जात असेल तर चित्रकूटच्या संतांचा पूर्ण आशीर्वाद आहे. शिवरंजनी तिवारीचे वडील, भाऊ आदींचाही या यात्रेत सहभाग आहे.