BCCI Central Contracts | हलगर्जीपणा भोवला ! ईशान किशन आणि श्रेयस अय्यर बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून बाहेर; कोट्यवधींचे नुकसान

BCCI Central Contracts : बीसीसीआयने खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. 2023-24 हंगामासाठी जाहीर झालेल्या या यादीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांची नावे नाहीत. दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नव्हता, यामुळे बीसीसीआय या खेळाडूंवर नाराज झाले होते. त्याचा परिणाम वार्षिक करार यादीत दिसून आला आहे.

यापूर्वीच्या करारात (BCCI Central Contracts) श्रेयसला बी श्रेणीत तर ईशानला सी श्रेणीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी श्रेयसला वर्षाला 3 कोटी रुपये आणि ईशानला 1 कोटी रुपये मिळत होते. मात्र आता त्यांचे इतके कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

खेळाडूंना किती पैसे मिळतात?
ग्रेड ए प्लसमध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वार्षिक7 कोटी रुपये मिळतात. ए ग्रेडला 5 कोटी रुपये आणि बी ग्रेडला 3 कोटी रुपये मिळतात. सर्वात कमी सी श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जातात.

ग्रेड ए+: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा

ग्रेड ए: रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.

ग्रेड बी: सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.

ग्रेड सी: रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

वेगवान गोलंदाज: आकाश दीप, विजयकुमार वैश्यक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव