हद्द झाली! स्टेजवरच कपडे उतरवत तरुणीचे अश्लील नृत्य, तरुणाचं सर्वांसमोर किस – video

bhandara viral video: सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. विनोदी, हटके, रोमँटिक तर कधी कधी अश्लील व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत आल्याचे पाहायला मिळते. काहीजण तर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम नकोसे कृत्य करताना दिसतात. असाच काही प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही गावात घडल्याचे समोर आले आहे. येथे मंडईनिमित्त अश्लील डान्स केल्याची घटना समोर आली आहे. हा कार्यक्रम १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दिवसापासून भंडारा जिल्ह्यात मनोरंजनासाठी गावोगावी नाटके, डान्स हंगामा, लावणीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकडोंगरी येथे डान्स हंगामाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने नागपूर येथील एका डान्स ग्रुपला बोलवण्यात आले होते. डान्स करत असताना अचानक मुलींच्या शरीरावरील कपडे काढत नग्न अवस्थेत अश्लील डान्स सादर करण्यात आला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी आयोजकांसह इतर जणांवर गोबरवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. तर प्रत्येक कार्यक्रमात दोन पोलिस कर्मचारी उपस्थित असताना देखील अश्लीलता गाठली गेल्यामुळे पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.