Atul Deshmukh | भाजपचे आळंदीचे समन्वयक अतुल देशमुख यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Atul Deshmukh | भाजपचे शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड आळंदीचे समन्वयक अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

पक्षप्रवेशा दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. देशमुखांनी आज निर्णय घेतला. लोकांचे काम करण्याची भूमिका त्यांनी खेड तालुक्यात बजावली. परंतु, लोकांच्या समस्यात आणि भाजपच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, माढा येथील धैर्यशील मोहिते पाटील हे आज भेटण्यासाठी आले होते. येत्या १६ तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, त्यांनी जे विधान केले त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपाबरोबर जायला पाठिंबा दिला असे ते म्हणाले. पण भाजपामध्ये कुणी गेले का? तर अजिबात नाही असेही शरद पवार बोलताना म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, उमेदवारीच्या संदर्भात चर्चा केलेली नाही. कशाचेही अपेक्षा न करता काही लोक पक्षात येतात. ज्यांनी प्रवेश केला त्यांनी कशाचीही अपेक्षा ठेवलेली नाही. अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहा. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तीमत्वावर टीका केली जात आहे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे.असेही शरद पवार म्हणाले.

अतुल देशमुख (Atul Deshmukh ) म्हणाले की, गेल्या १० वर्षात भाजपचे काम करत असताना पक्ष वाढवण्याचे काम केले. मात्र, गेल्या काही वर्षात स्वाभिमानाला धक्का बसला. सर्व सामान्यांचे काम होत नसतील आणि स्वाभिमानाने राहायचे असेल तर एकच नाव समोर आले ते म्हणजे पवार साहेबांचे होते. त्यामुळे आज आम्ही शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे देशमुख यांनी स्पष्ट केलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत