Sharad Pawar | प्रफुल्ल पटेल यांचे विधान उघड खोटे,अजित पवारांचा भाजपला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी 100% फेटाळला

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेबाबत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या दाव्याला उत्तर देताना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अशा कोणत्याही प्रस्तावाला ठामपणे नकार दिला. पटेल यांचे विधान मतदारांमध्ये संभ्रम पेरण्याचा हेतुपुरस्सर केलेला प्रयत्न अशी टीका महेश तपासे यांनी केली.

शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या कोणत्याही कल्पनेला तत्वतः आणि कृतीत ठामपणे नकार दिला. ही कृती शरद पवारांच्या राजकीय विचारांच्या अतूट बांधिलकीचा पुरावा आहे.

भाजपला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव नाकारणे हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतरांसाठी निराशाचे कारण झाले. ही मंडळी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात प्रासंगिकता राखण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वावर अवलंबून आहेत असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

तपासे पुढे म्हणाले अजित पवार गटाच्या नेत्यांच्या सर्व चौकशा आता बंद झाल्या असून अनेक प्रकरण थंड बस्त्यात पडले आहेत व हेच भाजपसोबत जुळवून घेण्याचे प्रमुख कारण होते. भाजपसोबत जाण्यात विकासाचा कुठलाच मुद्दा नव्हता.

अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. महाराष्ट्राची निष्ठा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आणि राज्याच्या भवितव्यासाठी त्यांच्या विचारांवर कायम आहे. महाराष्ट्र आगामी निवडणुकांच्या तयारीत असताना, लोकहितासाठी, समतेसाठी व इतर मूलभूत अधिकाऱ्यांसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही तपासे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत