FTII मध्ये पुन्हा राडा, कॅम्पसमध्ये बाबरी मशीदच्या स्मरणाार्थ बॅनर लावण्यात आल्याने पेटला नवा वाद

FTII Babri Masjid Banner: काल अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir Pranpratishta) सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र एकीकडे अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे पुण्यात फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये  (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

एफटीआयआयमधील काही विद्यार्थ्यांनी बाबरीच्या स्मरणार्थ एक बॅनर कॅम्पसमध्ये लावला. बाबरी पाडली जाणं म्हणजे संविधानाचा मृत्यू अशा आशयाचं वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलं. सोशल मीडियावर त्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हा वादग्रस्त बॅनर काढायला लावला. दरम्यान एफटीआयआयमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी