Tanushree Dutta : तनुश्रीनं काढली नाना पाटेकरांची लायकी, ‘ते तर तेव्हाही अन् आताही…’

Tanushree Dutta: जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपट द व्हॅक्सिन वॉरच्या (The Vaccine War) प्रोमोशनमद्ये व्यस्त आहेत. मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने प्रोमोशनवरुन नानांवर निशाणा साधला आहे. ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत तनुश्रीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी ती बोलत होती.

नाना पाटेकर यांची २००८ मध्ये देखील तेवढी लायकी नव्हती की चित्रपट प्रमोशन करण्याची आणि आताही नाही. तुम्हाला माहिती नाही ही लोकं आता फारशी महत्वाची राहिलेली नाहीत. त्यांच्याविषयी आणखी काय बोलायचं. माझ्यामुळे यांच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ते माझे नाव घेत त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करतात, अशी टीका तनुश्रीने केली आहे.

मला कुणाचे प्रमोशन करायचे नाही. पण ती लोकं मुद्दाम मीडियाला मला प्रश्न विचारण्यास सांगतात. त्यामुळे नको त्या विषयांना प्रसिद्धी दिली जाते. जे होते आहे ते मला सांगायचे आहे, असेही तिने म्हटले आहे.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती