कॉंग्रेस पक्षाने गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे – आनंद शर्मा

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी रविवारी हिमाचल प्रदेश सुकाणू समितीचा राजीनामा दिला. आनंद शर्मा हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी मोठं वक्तव्य करताना म्हटलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्ष फक्त सोनिया आणि राहुल गांधी (Sonia Gandhi and Rahul Gandhi) यांच्यापुरता सीमित झाला आहे , असेही ते म्हणाले.

एनडीटीव्हीशी संवाद साधताना आनंद शर्मा म्हणाले, काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्यापुरते मर्यादित राहण्याचे कारण नाही . काँग्रेस फक्त या दोन नावांपुरती मर्यादित आहे का? आपण काँग्रेस पक्षाच्या इतिहासाची चेष्टा तर करत नाही ना? आम्ही बंडखोर नाही, आम्ही सुधारणावादी आहोत. पक्षाच्या घटनेचे पालन करण्यास सांगितले. हा गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

आनंद शर्मा यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे . आपल्या राजीनाम्यात ते म्हणाले, पक्षाने सल्लामसलत प्रक्रियेत त्यांचा सल्ला घेतला नाही किंवा त्यांना कोणत्याही बैठकीसाठी बोलावले नाही. यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, ज्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या बाजूने निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याचे आनंद शर्मा यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.