दाऊद इब्राहिमचा लागला ठावठिकाणा; भाच्यानं केला मोठा खुलासा

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Underworld don Dawood Ibrahim) ठावठिकाणा लागला आहे. संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी (UN-declared Terrorist) आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा झाला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे.

दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलंय. दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर ही कबुली दिलीय. ईडी मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

अलीशाह पारकरने ईडीला सांगितलं, दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, दाऊदची बायको महजबीनने सणांच्या काळात माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता.