केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू; राज्यात अतिदक्षतेचा इशारा

Nipah virus – केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी तीन जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं आहे, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी काल कोझीकोड इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या आणखी दोन रुग्णांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यातील एक बाधित हा नऊ वर्षे वयाचा मुलगा आहे. त्याची स्थिति चिंताजनक असून त्याला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचं पथक आज केरळमध्ये पोहोचत असून वन आणि पशुकल्याण विभाग याबाबत सर्वेक्षण करीत आहे. यासाठी राज्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून तिथं 0495-2384101, 2383100, 2383101, 2386100 या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. केंद्र सरकारनं परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र पथक पाठवल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.

https://youtube.com/shorts/Tn13poRRNl4?si=Fnp7msXQ_47fDZ0H

महत्त्वाच्या बातम्या-

Ajit Pawar गटाला ट्विटरचा मोठा दणका, Sharad Pawar गटाने तक्रार केली होती

भारतीय संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम, श्रीलंकेविरोधात जिंकूनही टीम इंडियाचा झाला अपमान!

दोन बिस्किटे दिल्यावर चावणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव; भाजप नेत्याने दिली जुन्या वक्तव्याची आठवण करून