धनगर आंदोलनात आलेल्या रोहित पवारांवर कार्यकर्ते भडकले; प्रश्नांचा भडीमार करत विचारला जाब 

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर समाजाकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार होता, पण हा मोर्चा पोलिसांनी टेकडी रोडवर अडवला. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर 5 जणांचं शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जाणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी ठरवलं.

धनगर समाजाच्या या मोर्चामध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला, पण रोहित पवारांच्या एण्ट्रीनंतर धनगर समाजाचे कार्यकर्ते भडकल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनकर्त्यांनी रोहित पवारांची भेट तर घेतली पण त्यांना मंचावर येऊ दिलं नाही. चर्चा करताना आंदोलकांनी तुम्हाला कुणी बोलावलं? असा प्रश्न विचारला.

रोहित पवारांसमोरच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली, यानंतर पोलिसांनी रोहित पवारांना गर्दीतून बाहेर काढले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.