Crime News | काळी जादू केल्याच्या संशयावरून वृद्धावर अत्याचार, जळत्या निखाऱ्यांवर नाचायला लावले 

Crime News | ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे काही लोकांनी 75 वर्षाच्या वृद्धाला जळत्या कोळशावर नाचण्यास भाग पाडले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल (Crime News) केला आहे. घटना ४ मार्चची आहे. मुरबाड (Murbad) तालुक्यातील कर्वेळे गावात घडलेल्या या घटनेत वृद्धाच्या अंगावर अनेक ठिकाणी भाजण्याच्या खुणा होत्या.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात काही लोक वृद्धाला पकडून बसलेले दिसत आहेत. त्यांना जळत्या कोळशावर नाचायला लावले जात आहे. या दरम्यान जमाव जल्लोष करत आहे. गावातील एका मंदिराजवळ स्थानिक लोकांनी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्या वेळी 15-20 लोक वृद्धाच्या घरात घुसले. त्यानंतर वृद्धाला जबरदस्तीने कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यात आले.तेथे त्याला जळत्या निखाऱ्यांवर नाचण्यास भाग पाडण्यात आले.

माहिती देताना मुरबाड पोलीस (Murbad Police) ठाण्याचे निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सांगितले की, काही ग्रामस्थांनी आरोप केला की वृद्ध व्यक्ती काळी जादू करत असे. यामुळे समारंभात त्यांना मारहाण झाली. या वृद्धाचे पाय आणि पाठ भाजल्याचे पोलिसांनी सांगितले. वृद्धांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगळवारी काही लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४५२, ३२३, ३२४ अंतर्गत एफआयआर नोंदवला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा