Mumbai Indians | मुंबई इंडियन्समध्ये उभी फूट, संघ दोन गटात विभागला गेला, रोहित शर्मा-हार्दिक पांड्यामध्ये उग्र गटबाजी!

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांचा पाच वेळचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून आयपीएलच्या चालू हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले आहे. मात्र हार्दिकच्या आगमनाने संघातील वातावरण पूर्वीसारखे खेळीमेळीचे राहिले नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दोन कॅम्पमध्ये विभागलेले दिसते. हार्दिकचे नेतृत्त्वही बेजबाबदार दिसते. त्याची रणनीती सपशेल अपयशी ठरत आहे. या संघाने सलग दोन सामने गमावले आहेत. हार्दिक पांड्याचे वरिष्ठ खेळाडूंसोबतचे ट्यूनिंगही चांगले चाललेले नाही. विशेषत: माजी कर्णधार रोहित शर्मासोबत त्याचे संबंध अजिबात सौहार्दाचे नाहीत. परिणामी संघातील गटबाजी शिगेला पोहोचली असल्याचे चित्र आहे.

हार्दिक-रोहितचे नाते आणखी बिघडत चालले आहे
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सने ज्या प्रकारे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांच्यासह काही खेळाडू आता रोहित शर्माच्या कॅम्पमध्ये आहेत, तर हार्दिक पांड्याला इशान किशनसह संघ मालकांचा खुला पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे कोचिंग स्टाफही विभागलेला दिसतो. हार्दिक पांड्याचे किरॉन पोलार्डसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध कोणापासूनही लपलेले नाहीत, तर त्याने गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाला खुर्चीवरून हटवून स्वत: बसवल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंबानी कुटुंबाचा पाठींबा
त्याला कशाचीही पर्वा नाही हे हार्दिक पांड्याच्या खेळात स्पष्टपणे दिसून येत आहे. अंबानी कुटुंबाकडून त्याला ज्याप्रकारे उघडपणे पाठिंबा मिळतो, त्यावरून त्याच्या खेळात निष्काळजीपणा दिसून येतो. उदाहरणार्थ, जसप्रीत बुमराहसारख्या वरिष्ठ गोलंदाजाला न पाठवता पहिल्या सामन्यात तो स्वत: गोलंदाजी करताना दिसला आणि दुसऱ्या सामन्यात त्याने 17 वर्षांच्या अननुभवी आणि नवोदित माफाकाला संधी दिली. पांड्याच्या या वृत्तीचे परिणाम संघ भोगत आहे. सामना हरल्यानंतर हार्दिक पांड्याला जबाबदारी घ्यायला शिकावे लागेल. 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे, असे असतानाही हार्दिक पांड्याचा हिटमॅनबद्दलचा दृष्टिकोनही समजण्यापलीकडे आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?