डिसले गुरुजी अडचणीत ?, पुरस्कारासाठी खोटी माहिती दिल्याचा आरोप

सोलापूर : ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन झालेल्या मुख्य सभेत रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. परितेवाडी भागातील जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी हे आरोप केले आहेत.

पुरस्कारासाठी डिसलेंनी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे. लोक कन्नड भाषिक असून झेडपी शाळा गोठ्यात भरते. तसेच येथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी दिल्याचा आरोप झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी केला. भारत शिंदे हे परितेवाडी भागातील जिल्हा परिषस सदस्य असून त्यांनी झेडपीच्या ऑनलाईन सभेत हा आरोप करत निषेध केला.

दरम्यान, यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डिसले गुरुजींनी प्रसारमाध्यमासमोर मी अनावधानाने बोलल्याची कबुली पत्राद्वारे दिली आहे, असे या सीईओ स्वामी यांनी सांगितलं होतं. रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पानाचे पत्र लिहून यापुढे माध्यमासमोर न जण्याची हमी दिल्याची सीईओंनी माहिती दिली होती.