परिक्षेत चांगला निकाल हवाय? मग ‘या’ टिप्स वापरुन मेंदूला बनवा शार्प, आजपासूनच करा सुरुवात

परीक्षा जवळ येताच विद्यार्थ्यांच्या मनात तणाव निर्माण होतो. प्रत्येक विद्यार्थी परीक्षेच्या वेळेत तणावात असतो. जर विद्यार्थ्याची पूर्ण तयारी नसेल तर तो नीट लिहू शकणार नाही, असे विद्यार्थ्याला वाटते. अशा तणावामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दोन ते तीन महिने आधीच दडपण येऊ लागते. परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो हे खरे आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी तुम्ही टेन्शन घ्यावे. उलट तुम्ही अगदी निवांत मनाने परीक्षेची चांगली तयारी (Exam Tips) करू शकता. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना काही चांगल्या टिप्स दिल्या तर निकालही चांगला लागेल (Study Tips) याची खात्री असते. येथे आम्ही परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय आरामात परीक्षा देऊ शकता. (How to boost your mind in exam)

रात्री चांगली झोप-
थॉमस एडिसन स्टेट युनिव्हर्सिटीनुसार परीक्षेच्या आधी रात्री चांगली झोप (Good Sleep) घेणे आवश्यक आहे. म्हणूनच रात्री उशिरापर्यंत जागे राहू नका. रात्री चांगली झोप येण्यासाठी मोबाईल फोन (Mobile) आणि गॅझेट दुसऱ्या खोलीत ठेवा. रात्री लवकर झोपा आणि सकाळी उठण्याचा प्रयत्न करा.

प्रथिनांचे पुरेसे सेवन-
परीक्षेच्या वेळी तुमचा नाश्ता सामान्य दिवसांसारखा नसावा, त्यामध्ये प्रथिनांचे (Proteins) प्रमाण पुरेसे असणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी दररोज नाश्त्यात अंडी, पीनट बटर, दूध, पनीर, स्प्राउट्स, हिरव्या भाज्या इत्यादींचे सेवन करा. दररोज फळांचे सेवन वाढवा. दररोज आपल्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. सकाळी उठताना रोजच्या प्रमाणे कॉफीचे जास्त सेवन करू नका. हंगामी भाज्या आणि फळांचे सेवन पुरेशा प्रमाणात वाढवा. परीक्षेदरम्यान पाणीही जास्त प्रमाणात प्या.

व्यायाम-
परीक्षा जवळ येताच व्यायामाचा (Exercise) वेळ वाढवा. स्नायू ताणण्याचे व्यायाम करा. परीक्षेपूर्वी योगासने वाढवा. जास्त वेळ एकत्र खुर्चीवर बसू नका आणि खुर्चीवरून उठून शरीराची हालटाल करा. स्नायू मजबूत करा. व्यायामाने केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांतीही मिळते.

दीर्घ श्वासाचे व्यायाम-
परीक्षेदरम्यान दीर्घ श्वास घेऊन ध्यान (Meditation) करा. परीक्षा देताना, परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका वाचण्यापूर्वी प्रथम दीर्घ श्वास घ्या. परीक्षेदरम्यान दीर्घ श्वास घेण्याचा सराव वाढवा. एखाद्या तज्ञाच्या देखरेखीखाली ध्यान केले तर ते अधिक चांगले होईल.

संतुलित आहार-
परीक्षेत मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार (Healthy Diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, तुमच्या आहारात ब्लूबेरी, हळद, कोबी, भोपळ्याच्या बिया, डार्क चॉकलेट, बदाम, संत्री, अंडी, ग्रीन टी इत्यादींचा समावेश करा. हे पदार्थ स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात.