खळबळजनक : टॉलिवूड सिनेसृष्टीतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला

नवी दिल्ली : टॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘शालू चौरसिया’वर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. हा हल्ला इतका जोरदार होता की यामध्ये शालू चौरसिया गंभीर जखमी झाली आहे.

ही संपूर्ण घटना रविवार (दि. 14) रात्रीच्या वेळी हैद्राबादमधील बंजारा हिल्सजवळील केबीआर पार्कजवळ घडली. शालू ही रात्री 8:30 च्या दरम्यान बंजारा हिल्सजवळील केबीआर पार्कजवळ फिरण्यासाठी गेली होती. यावेळी ती पार्कमध्ये बसली. आणि अचानक रात्री 11 वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने शालूवर हल्ला केला. यावेळी आरोपीने तिला तुझ्या जवळील पैसे.. आणि सामना मला दे.. अशी धमकी दिली. मात्र, तिने नकार देताच या आरोपीने शालू चौरसियावर धारधार शस्त्राने तिच्या चेहऱ्यावर जोरात वार केला.

तसेच तिच्या दिशेने दगडही फिरकवला. आणि तिच्या जवळील मोबाईल हिसकावून पळ काढला. या हल्यात शालू चौरसियाला गंभीररित्या जखमी झाली आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.