Navneet Rana | नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडूंची घोषणा 

भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.

दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे. आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे.

उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय भाजपचा आहे. माझ्यासह जनतेत रोष आहे. हा रोष निकालात दिसणार आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिली हे, चांगलंच झालं आहे. अब मजा आऐगा. प्रहारची भूमिका कायम आहे. येथे प्रहारचे अस्तित्व आहे. आम्ही नियोजनबद्द लढू. आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. आमची स्वत:ची पानटपरी (स्वत:चा पक्ष) आहे. आमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?