सिंहगड किल्ल्यावर जाण्यसाठी वन विभागाकडून पर्यायी सुरक्षित घाटमार्गासाठी पाहणी सुरु 

Pune – सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad forts) जाणाऱ्या असुरक्षित घाटमार्गावर झालेल्या अपघातांचं कारण देऊन इ बससेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर; आता वन विभागाकडून (Forest Department) पर्यायी सुरक्षित घाटमार्गासाठी पाहणी सुरु झाली आहे.

सध्याचा घाटमार्ग सुरक्षित नसून नव्यानं सुरु झालेली इ बस या मार्गावरील कठड्याला धडकण्याच्या दोन दुर्घटना घडल्या. बसमधील प्रवासी थोडक्यात बचावल्यानंतर हा घाटमार्ग बस वाहतुकीसाठी सुरक्षित होईपर्यंत बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. आता सध्याचा घाटमार्ग सुरक्षित करण्याबरोबरच गडावर जाण्यासाठी पर्यायी सुरक्षित मार्ग कुठून निघू शकतो याबद्दलचं सर्वेक्षण वन विभागाकडून सुरु झालं आहे.