याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? 

चौंडी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी (chaundi) येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार NCP President MP Sharad Pawar प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी त्यांना निमंत्रित केलं आहे.

दरम्यान, यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होणार आहे. मात्र पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखलं असून यामुळे रस्त्यावरच समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.दरम्यान, शरद पवारांची सभा होणार असल्याने पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चौंडीच्या वेशीवर रोखला. यामुळे गोपीचंद पडळकरांचे समर्थक संतापले.

त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. आम्हाला आडकाठी कशासाठी केली असं गोपीचंद पडळकर सांगितलं. हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही त्याला उपस्थित राहू शकते, असेही ते म्हणाले. याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? जयंतीला का आला नाहीत? का दर्शनासाठी येथे आला नाहीत? आता तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि आमचं ऊर्जास्थान तयार झालेल्या चौंडी येथे तुम्हाला हल्ला करायचा आहे. आमचा इतिहास तुम्हाला बुजवायचा आहे, बहुजनांचे लचके तोडायचे आहेत म्हणून हा घाट घालता. शरद पवार आणि त्यांच्या नातवाने कार्यक्रमाला गालबोट का लावलं आहे? अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी सुरू केली.