लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा आणि ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन..

पुणे प्रतिनिधी : भाजपा युवा नेते लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित बालेवाडी, बाणेर, औंध, सुस, महाळूंगे, पाषाण, सुतारवाडी, आणि सोमेश्वरवाडी (Balewadi, Baner, Aundh, Sus, Mahalunge, Pashan, Sutarwadi, and Someshwarwadi) परिसरात प्रथमच भव्य महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ३ जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून बक्षीस वितरण सोहळा ६ जानेवारी रोजी ‘चैतन्यस्पर्श’ पादुका सोहळ्या मध्ये संपन्न होणार आहे.

विविध सामाजिक उपक्रमातुन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांचा वाढदिवस सांप्रदायिक क्षेत्रांत भजनी मंडळांना चालना मिळावी या उद्देशाने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने भव्य व आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. परिसरातील जवळ पास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होतील.

युवा नेते लहू बालवडकर यांनी आझाद मराठीला या स्पर्धेची माहिती देत असताना सांगितले की, परिसरातील नागरिकांची सेवा विविध उपक्रमातून करत असताना आपला वाढदिवस या वेळी सांप्रदायिक क्षेत्रातील नागरीकांसाठी भजन स्पर्धा आयोजित करून साजरा करणार आहे. आपल्या परीसरात भजनी मंडळे मोठया प्रमाणात असून त्यांना चालना मिळावी उत्साह वाढावा व हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतुने नियोजन बद्ध भव्य स्वरूपात आगळी वेगळी भजन स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी आयोजित केली आहे. जवळपास शंभर पेक्षा अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असून आपला परीसर टाळ मृदंगाच्या गजरात दमदमून जाईल. प्रत्येक वर्षी सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. इतून पुढे देखील अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुरू ठेवून एक हक्काचे व्यासपीठ स्पर्धकांना उपलब्ध करून देणार आहे. तसेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दरवर्षी प्रमाणे मोठया भव्य स्वरूपात होणाऱ्या भारतातील १२ शक्तिपीठांचा ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व पादुका दर्शन सोहळ्या दरम्यान होणार असुन या सोहळ्याला परिसरातील १८००० हजार भाविक उपस्थित राहून अन्न प्रसादाचा लाभ घेतील.

स्पर्धेची बक्षिसे आणि स्वरूप :

पहिले बक्षिस – ५१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

दुसरे बक्षिस – ४१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

तिसरे बक्षिस – ३१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

चौथे बक्षिस – २१००० रूपये आणि सन्मानचिन्ह

पाचवे बक्षिस – ११००० रूपये आणि सन्मानचिन्ह

वैयक्तिक बक्षिसे :

उत्कृष्ट गायन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह

उत्कृष्ट मृदंगवादन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह

उत्कृष्ट हार्मोनियम – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह

इतर ५ आकर्षक बक्षिसे प्रत्येकी ५५५५ रुपये

सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळास आकर्षक भेटवस्तू आणि येण्या जाण्याचा खर्च दिला जाणार आहे.

स्पर्धेचे स्वरुप :

३/४/५ जानेवारी रोजी प्राथमिक फेरी होईल

स्थळ – विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी .

महा अंतिम फेरी ६ जानेवारी रोजी

स्थळ : सर्व्हे नंबर १९/१/१ बाणेर – बालेवाडी रोड, कम्फर्ट झोन सोसायटी समोर, बालेवाडी पुणे – ४५

संपर्क : ८३८०९९००७७/९३७१९९००७७