Hardik Pandya | अरे भाई अ‍ॅडजस्ट नही होता हैं…. गुजरात टायटन्स सोडणाऱ्या पांड्याचा VIDEO लिक?

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज दिसत आहे. 2023 च्या विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. हार्दिक आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याने नोकराला आवडीचे जेवण न मिळाल्याने खडसावले आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना 22 मार्च रोजी होणार आहे. तर गुजरात टायटन्सचा सामना 4 एप्रिलला पंजाब किंग्जशी होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) कॅम्पमध्ये सामील झाला आहे, जिथे त्याने प्रशिक्षण सुरू केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो स्टार स्पोर्ट्ससाठी आयपीएलचा एक व्हिडिओ शूट करण्यासाठी रूममध्ये बसलेला दिसत आहे. यावेळी त्याला त्याच्या आवडीनुसार आणि आहाराप्रमाणे जेवण देण्यात आले नाही. हे जेवण दिल्यानंतर पांड्याला समोरच्या व्यक्तीचा खूप राग आला. या व्हिडिओमध्ये तो स्पष्टपणे असे म्हणताना ऐकू येतो की, “भाऊ, मी हा जिलेबी ढोकळा कसा खाणार… हे काय आहे… भाऊ, मी कसे खाऊ शकतो. हे सगळं खाल्ल्यावर माझा स्टॅमिना बिघडेल. भावा मला हे ऍडजस्ट नाही होणार.”

हार्दिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला नोकरावर ओरडल्यामुळे ट्रोल केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?