देवी सरस्वतीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं?; छगन भुजबळ पुन्हा बरळले 

Pune – राज्यात वाचाळवीर नेत्यांचा सिझन जोरात सुरु असून नेत्यांची वादग्रस्त वक्त्यव्ये सुरूच असल्याचे दिसून येत आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष बांगर,खासदार संजय राऊत,सुषमा अंधारे,मंत्री गुलाबराव पाटील या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करून राज्यातील राजकीय वातावरण गढूळ केले असताना आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सरवस्ती देवीच्या पूजेवर पुन्हा एकदा भाष्य करत वाद निर्माण केला  आहे.

सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं? जर त्यांनी शिक्षण दिलं तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावं लागलं? ब्राम्हण समाजात (Political News) फक्त पुरुषांना शिक्षण दिलं जायचं. ते ही महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून म्हणतो मी फक्त सरस्वतीची पूजा का? त्यामुळं सावित्रीबाई फुलेंना स्थान द्या, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केलं आहे. ते पुण्यात (pune) बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक ठिकाणी असतो याचा आम्हाला आनंद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान आहे. त्याबाबत ही काही दुमत नाही, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत असं घडत नाही. ते दुर्लक्षित असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे लवकरच भिडे वाड्याची अवस्था सुधारण्याबाबत सरकारशी चर्चा करणार आहोत. या वाड्याच्या सुधारणेसाठी सरकारकडे मागणीदेखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.