विरोधकांचा बुरखा फाटणार; राज ठाकरेंच्या सभेत पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’द्वारे टीकेचे बाण सुटणार 

मुंबई-   महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचं वादळ आता घोंगावू लागले असून विरोधक देखील गोंधळून गेल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज ठाण्यात राज ठाकरेंची उत्तर सभा होत आहे.

देशात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकांच्या कालावधीत आपल्या सभांमधून व्हिडीओद्वारे भाजपविरोधात टीकेची झोड उठविणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याची प्रचिती मनसेच्या कार्यकर्त्यांना घेता येणार आहे. ठाण्यातील सभेमध्ये राज ठाकरे हे व्हिडीओद्वारे विरोधकांवर टिकेचे बाण सोडणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी  दिली.