महिलांच्या प्रश्नांबाबत चाकणकरांच्या पत्रव्यवहारानंतर देवेंद्र फडणवीस घेणार बैठक

Pune – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Commission for Women Chairperson Rupali Chakankar) यांनी महिला सुरक्षितता तसेच त्यांच्यासंबंधीच्या महत्वाच्या अनेक प्रश्नांबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis) यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला होता. याबाबतीत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या सर्व विषयासंदर्भातील बैठक पुढील महिन्यात घेतली जाणार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी सर्वसमावेशक धोरण, विधवा महिलांसाठी घोषित केलेली पंडिता रमाबाई योजनेसाठी निधीची तरतूद करणे, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखला जावा यासाठी असणाऱ्या अंतर्गत तक्रार समिती अधिक सक्षम केल्या जाव्या, शालेय/महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेसाठी शाळा/महाविद्यालयांच्या बाहेर दामिनी पथकांची कायम स्वरूपी व्यवस्था करणे, बालविवाह रोखण्यासाठी ZP स्तरावरून कडक कारवाईचे निर्देश देणे तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यामध्ये काही महत्वाच्या सुधारणा कराव्या 6.विधवा प्रथाबंदी होण्यासाठी विशेष जनजागृती अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबविले जावे. या विषयांचा समावेश आहे.

याबाबत बोलताना चाकणकर यांनी यामाध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी लवकरच एक कृती कार्यक्रम राबविण्यात येईल अशी मला निश्चितपणे खात्री वाटते असा विश्वास व्यक्त केला आहे.