Asia Cup: भारताचा श्रीलंकेवर सोपा विजय, आठव्यांदा जिंकला आशिया चषक

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे.

श्रीलंकेच्या नाममात्र ५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर इशान किशनने नाबाद २३ धावा केल्या. तर शुबमन गिलने नाबाद २७ धावा फटकावल्या. अशाप्रकारे केवळ ६.१ षटकात भारताने श्रीलंकेचे आव्हान पूर्ण केले आणि १० विकेट्सने सामना जिंकला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना अवघ्या ५० धावांवरच रोखले. सिराजने ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. अष्टपैलू हार्दिकने २.२ षटकात ३ धावांवर ३ विकेट्स काढल्या. तर बुमराहनेही एका फलंदाजाला बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल