Khalistani Separatist Pannun : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाला अटक; अमेरिकेची कारवाई

Khalistani Separatist Pannun :  खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने एका भारतीय नागरिकावर केला आहे. पन्नूचे नाव न घेता, अमेरिकेने असा दावा केला आहे की त्यांनी शीख फुटीरतावादी राज्याची वकिली करणाऱ्या अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कथित कट उधळून लावला आहे. अमेरिकेने खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केलेल्या भारतीय नागरिकाचे नाव निखिल गुप्ता आहे. निखिल गुप्ताला हे काम भारत सरकारच्या एका कर्मचाऱ्याने करण्यास सांगितले होते, असा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. निखिलवर भाड्याने हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हा कट भारतातूनच रचण्यात आल्याचे अमेरिकन वकिलांचे म्हणणे आहे.

या तथाकथित कटाचा बळी ठरलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याचे नाव अमेरिकन न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात देण्यात आलेले नाही. मात्र, त्याचे नाव गुरपतवंत सिंग पन्नू असून त्याच्याकडे कॅनडा आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व असल्याचा संशय आहे. भारत सरकारने यापूर्वी सांगितले होते की त्यांनी या कटाच्या संदर्भात अमेरिकेच्या सुरक्षा चिंतेची चौकशी सुरू केली आहे. आरोप उघड झाल्यानंतर लगेचच व्हाईट हाऊसने हा मुद्दा भारत सरकारकडे वरिष्ठ पातळीवर मांडल्याचे सांगितले. भारतीय अधिकाऱ्यांनी आश्चर्य आणि चिंतेने उत्तर दिले, असे त्यात म्हटले आहे.

अमेरिकेपूर्वी कॅनडाने भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. हरदीप सिंग निज्जर यांची सरे काउंटीतील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडानंतर काही महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत भारतावर या हत्याकांडात हात असल्याचा आरोप केला होता. ट्रुडोचे आरोप फेटाळून लावत भारताने तिखट प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही देशांनी प्रत्येकी एका मुत्सद्याची हकालपट्टी केली. पुढे भारताने कॅनडाची व्हिसा सेवाही बंद केली आणि अनेक कॅनडाच्या मुत्सद्यांना भारतातून हाकलून दिले.

महत्वाच्या बातम्या-