Kangana Ranaut | कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिची हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने उमेदवारी केली आहे. कंगनाच्या नावाच्या घोषणेवर अनेकांची मते समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाबद्दल काही पोस्ट केले, ज्यानंतर गदारोळ झाला.

आता भारतीय जनता पक्ष कंगनाबद्दल (Kangana Ranaut) केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर हल्लाबोल करत आहे. वाढता वाद पाहून सुप्रिया यांनी ती पोस्ट डिलीट केली, मात्र भाजप नेते स्क्रिनशॉटच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला करत आहेत. सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाला मंडीतून तिकीट मिळाल्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. कंगनाचा बिकीनीतील फोटो टाकत सुप्रिया यांनी लिहिले, बाजारात आज काय भाव सुरु आहे हे कोणी सांगू शकेल का?  सुप्रियाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती.

दरम्यान, या टिकेनंतर नवा वाद निर्माण झाला असून कॉंग्रेसवर टीका होऊ लागली आहे. यातच आता कॉंग्रेस समर्थकांनी कंगनाच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला देत तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी उर्मिला मातोंडकरला कंगना सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणाली होती त्याची आठवण करुन दिली आहे. कंगनाच्या मुलाखतीचा तो अंश लोक एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आहेत आणि तू उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस त्याचं काय? असं विचारत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय