Jay Pawar | ‘आधी बारामती उरकतो मग पुणे..’ अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवाने बारामती लोकसभेला मनावर घेतलं

Jay Pawar : अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) येऊन ठेपल्या आहे. या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघांमध्ये मोर्चे बांधणी केली जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी बंड करून महायुतीमध्ये गेल्याने पवारांसाठी बारामती आणि पुणे लोकसभा या महत्त्वाच्या जागा असणार आहेत. बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) पायाला भिंगरी लावून मतदारसंघांमध्ये फिरताना पाहायला दिसत आहेत.

आज अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी तथा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीगाठी दरम्यान जय पवार यांनी पुण्यातील भेटीगाठीबाबत बोलत असताना आधी बारामती उरकतो नंतर पुणे असं म्हणत बारामती किती गांभीर्याने घेतले हे दाखवून दिलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर कुटुंबात आणि पक्षात मोठी फूट पडली आहे. यानंतर पवारांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना नमवण्यासाठी भाजप नेते अजित पवारांच्या साथीने तयारीला लागले आहेत. पवारांचा पराभव करायचा असल्यास पवार कुटुंबातीलच उमेदवार असावा, असा आग्रह अनेक भाजप नेत्यांचा आहे. यामुळेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव समोर येत आहे. याआधी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उतरले होते मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तर मावळची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता अजित पवारांनी घेतलेली दिसतेय. याचीच परिणीती म्हणून पार्थ आणि जय पवार पायाला भिंगरी लावून मतदारसंघात बैठकाचा धडाका लावला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

काही दिवसानंतर आचारसंहिता जाहीर होईल आणि महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण? हे स्पष्ट होईल, मात्र बारामती मध्ये पवार कुटुंबीयांमध्ये लढत झाल्यास ती देशभरात लक्षवेधी ठरेल यात मात्र शंका नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल