‘श्री कृष्णाची कृपा झाली तर मी लोकसभा निवडणूक लढवेन’, कंगनाने दिले राजकारणात उतरण्याचे संकेत

Kangana Ranaut In Politics: बॉलीवूडची पंगा क्विन कंगना रणौत तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या वक्तव्यांमुळेच चर्चेत असते. कंगनाचा तेजस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे कंगना निराश असून तिने मनाच्या शांतीसाठी द्वारकाधीशाकडे धाव घेतली आहे. कंगना मानसिक शांतीसाठी नुकतीच द्वारकाधीश मंदिरात गेली होती. कंगनाने श्री कृष्णाचे दर्शन घेतानाचे तिचे काही फोटो देखील सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

कंगनाने द्वारकाधीश मंदिरात पोहोचल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याच्या चर्चा आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाने मिडियासोबत बोलताना सांगितले की, ‘जर भगवान श्रीकृष्णाची कृपा झाली तर ती लोकसभा निवडणूक लढवू शकते.’ वर्ष २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होऊ शकतात.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे