Kangana Ranaut | कंगना राणौतला भाजपने दिले तिकीट,’या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

Kangana Ranaut | लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 111 उमेदवारांची नावे आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतलाही (Kangana Ranaut) भाजपने तिकीट दिले आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

अभिनेत्री कंगना राणौत अनेकदा स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची फॅन म्हणते. लोकसभा निवडणुकीची जागा मिळाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने पक्षाच्या हायकमांडचे आभार मानले आहेत. लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये रामची भूमिका साकारणारे अभिनेते  अरुण गोविल आणि अभिनेत्री कंगना रणौत या दोघांसाठी हे निवडणुकीतील पदार्पण असेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार