LokSabha Election 2024 | लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत समाप्त

लोकसभा निवडणूकीच्या (LokSabha Election 2024) पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता. या टप्प्यात महाराष्ट्रात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोला-चिमूर या जागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेकमध्ये 51, नागपूरमध्ये 62, भंडारा- गोंदिया 49, गडचिरोली- चिमूर 19 आणि चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.नागपूरमधून भाजपाचे विद्यमान खासदार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा ठाकरेंना पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी तर काँग्रेसकडून डॉ. प्रशांत पडोळे यांनी अर्ज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपले अर्ज दाखल केले. चंद्रपूरमधूनच एकंदर २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते, तर काँग्रेसकडून नामदेव किरसन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात एकंदर १२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी आज होणार असून येत्या 30 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अशी माहिती निवडणूक ( LokSabha Election 2024) आयोगानं दिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?