पंतप्रधान Narendra Modi यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यापासून साकारले भव्य पोट्रेट

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते आणि जय भवानी सहकारी बँकेचे संचालक किशोर उर्फ राजेंद्र तरवडे यांच्या वतीने मोदी यांचे धान्यापासून १८ बाय १० आकाराचे पोट्रेट साकारण्यात आले आहे. कालिका माता मंदिर, तपकिर गल्ली, बुधवार पेठ,पुणे येथे या पोट्रेट चे अनावरण आज करण्यात आले. अलीकडे रांगोळीच्या माध्यमातून अनेकदा पोट्रेट साकारले जातात, मात्र हे धान्यापासून साकारलेले पहिले पोट्रेट असून १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान हे पोट्रेट पुणेकरांना विनामूल्य बघता येणार आहे.

या प्रसंगी मा. स्थायी समिती अध्यक्ष आणि कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी आबा तरवडे, मेघना तरवडे, संजय देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

या भव्य पोट्रेट बद्दल बोलताना राजेंद्र तरवडे म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतीला आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. यामुळे त्यांच्या वाढदिवसाला शेतीशी निगडीत काहीतरी वेगळे करण्याचा आमचा विचार होता, त्यातून या पोट्रेट ची कल्पना समोर आली. धान्याचा वापर करून निर्माण केलेले हे पोट्रेट म्हणजे माझ्या सारख्या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेले वंदन आहे.

भव्य पोट्रेट गणेश खरे, सुधीर शिंदे आणि त्यांच्या टीमने साकारले असून त्यांना यासाठी सुमारे ३ कलाकार काम करत होती एकूण १६ तासांचा कालावधी लागला आहे. या पोट्रेट मध्ये गहू, तीन प्रकारचे तीळ, ज्वारी, डाळ, हळीव, मूग, मटकी यांचा वापर करण्यात आला असून एकूण धान्य पन्नास किलो पेक्षा जास्त असल्याचेही तरवडे यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त पुणेकरांनी हे पोट्रेट बघायला यावे आणि या अभिनव कलेला दाद द्यावी.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=-dHV1iQBLGLbEBd_

महत्त्वाच्या बातम्या-
संभाजी भिडेंच्या विरोधात कारवाई होत नसल्याने तुषार गांधी ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ पुस्तकाचे होणार Mohan Bhgwat यांच्या हस्ते प्रकाशन

‘नवीन आरोग्यकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा’