प्रफुल पटेल यांचाही दाऊदच्या लोकांशी व्यवहार, त्यांचं काय करणार? राऊतांनी फडणवीसांना कात्रीत पकडलं

Sanjay Raut: महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत (Mahayuti) घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, फडणवीस यांनी परस्पर अजित पवारांना हे पत्र न देता ते सार्वजनिक केले आहे. दरम्यान मलिक हे दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपामुळे युतीचे भाग होऊ शकत नाहीत, या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाची खिल्ली उडवताना ‘मग पटेलांचे काय’, अशी विचारणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

‘राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यावरही नवाब मलिक यांच्यासारखेच आरोप आहेत. त्यांचेही दाऊदच्या लोकांशी व्यवहार असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. मग पटेल यांच्याबाबत तुमचे मत काय आहे’, असा थेट प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

‘नवाब मलिक यांच्यावर तुम्ही हल्ला करत आहात. पण त्याच प्रकारच्या आरोपाचा खटला प्रफुल पटेल यांच्यावरही आहे. त्यांचाही दाऊदच्या लोकांशी जमीन व्यवहार आहे. याप्रकरणी ईडीने कारवाई केली असून, पटेल यांची मालमत्ताही ईडीने जप्त केली आहे. पटेल हे तत्कालीन काँग्रेसप्रणीत सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा याच मुद्द्यावर भाजपने सोनिया गांधींना प्रश्न केला होता. मग पटेल यांच्याबाबत तुमचे मत काय आहे असा फडणवीस यांना आपला प्रश्न आहे’, असे राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम