Suhani Bhatnagar | अंगाला सूज आली, फुफ्फुसात पाणी भरले; ‘दंगल गर्ल’ ​​सुहानी भटनागरला झाला होता दुर्मिळ आजार

Suhani Bhatnagar Death Reason: आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात दिसलेली बालकलाकार सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचे निधन झाले आहे. वयाच्या 19 व्या वर्षी सुहानीने जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत सुहानीचे निधन झाले. चुकीच्या उपचारामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘दंगल’ चित्रपटात सुहानीने छोट्या बबिताची भूमिका साकारली होती. तिच्या निधनाने सिनेजगतात शोककळा पसरली आहे.

सुहानीच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की,”दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या (Suhani Bhatnagar) हाताला सूज येऊ लागली होती. जे आम्हाला सामान्य वाटत होते पण नंतर तिच्या दुसऱ्या हाताला आणि नंतर संपूर्ण शरीरात सूज वाढली.”

“नंतर अनेक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला, परंतु कोणताही डॉक्टर हा आजार ओळखू शकला नाही. सुमारे 11 दिवसांपूर्वी, गेल्या मंगळवारी सुहानीला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे तिच्या टेस्ट करण्यात आल्या, तेव्हा असे दिसून आले की सुहानी डर्माटोमायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जो अत्यंत दुर्मिळ आजाराच्या श्रेणीत येतो. या आजाराचा एकमेव उपचार म्हणजे स्टेरॉईड्स. त्यानंतर तिला स्टेरॉईड्स देण्यात आले, त्यामुळे तिच्या शरीरातील स्वयंप्रतिकार शक्ती प्रभावित झाली आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली.” असंही सुहानीच्या वडिलांनी सांगितलं.

पुढे सुहानीच्या वडिलांनी सांगितले की, “डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजारातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे सुहानीला रुग्णालयात संसर्ग झाला. तिची फुफ्फुसे कमकुवत झाली. त्यामुळे फुफ्फुसात पाणी भरले. ज्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. काल संध्याकाळी सुहानीने अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा निरोप घेतला.”

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया