मास्टरस्ट्रोक : फडणवीसांच्या खेळीमुळे विरोधक कोमात

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री (Eknath Shinde is the Chief Minister of the state) असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.

आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, भाजपाने(BJP) हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल,अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेची कुणालाही कल्पना नव्हती. फडणवीसांच्या या खेळीमुळे केवळ विरोधकच नव्हे तर स्वपक्षीय देखील अजूनही धक्क्यात आहेत. आता सरकार जरी एकनाथ शिंदे याचं स्थापन होत असले तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांकडेच असणार आहे. त्यामुळे फडणवीसांचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे, असेही बोलले जाते. त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही सणसणीत उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केल्याने महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांकडेही आता बोलण्यासारखं फार काही नसणार आहे.