14 मे रोजी ढाण्या वाघाची सभा; मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर कोण असणार ?

मुंबई – मुंबई पालिकेने (BMC) ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण जाहीर केलं असून या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मी 14 तारखेला अनेकांचा मास्क  काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक (Mic) समोर मास्क (Mask) काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही. असं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले होते.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला आज शिवसेनेकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 14 मे रोजी बीकेसीमधे होणाऱ्या जाहीर सभेचा टीझर ट्वीट करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsenapramukh Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर (Teaser) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता 14 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री कोणाचा मास्क काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, युती तुटल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडलाय अशाच पद्धतीची टीका भाजप नेत्यांनी सातत्याने शिवसेनेवर केलीय. याच मुद्यावरुनच उद्धव ठाकरे भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधणार हे निश्चित. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) भोंग्यांचा अल्टिमेटम. राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसेचा मुद्दा. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपकडून शिवसेनेला टार्गेट (Target) करण्याचा प्रयत्न असो. वा राणे (Rane) पिता-पुत्रांकडून ठाकरे पिता-पुत्रांवरची टीका. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.