‘मी शरद मित्र’ मोहिमेची कोथरूड मधून सुरुवात

कोथरूड विधानसभा मधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने आज ‘मी शरद मित्र’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ही संकल्पना कोथरूड राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे आणि युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी राबविली आहे. आज या अभियानाची सुरुवात होत असताना पुढील चार दिवस कोथरूड मतदार संघातील विविध प्रभागातील जवळपास ९ ठिकाणी ही सदस्य नोंदणी अभियान होनार आहे.

मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथी च्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या मतदारांमध्ये समन्वय साधण्याची मुहूर्तमेढ या माध्यमातून होईल तसेच पवार साहेबांचे पुरोगामी विचार मतदार संघातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सदस्य नोंदणी अभिनंदन होणार आहे असे कोथरूड राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रथमच ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरनानी यांनी सांगितले. तसेच या मोहिमेतून लोकांची पवार साहेबांप्रती असलेले प्रेम व आदर भावना व्यक्त होण्यास माध्यम मिळेल असेही ते म्हणाले.

या प्रसंगी प्रशांत जगताप तसेच अंकुश काकडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी माध्यमांशी बोलत असताना प्रशांत जगताप यांनी स्वप्नील दुधाणे व गिरीश गुरनानी यांची प्रशंसा केली व म्हणाले की ही अभिनव कल्पना जी या दोघांच्या इच्छाशक्ती आणि सहेबांप्रतीच्या प्रेमातून जन्मली आहे ती संपूर्ण पुण्यात 100 ठिकाणी राबविण्यात येणार असून या माध्यमातून ५ लाख शरद मित्र जोडले जाण्याची संकल्पना आहे.

अंकुश काकडे यांनीही या मोहिमेचे कौतुक करत असताना वडीलधाऱ्या व्यक्तीला त्यांच्या या वयात सोडून जाने योग्य नाही असे सांगीतले. मी शरद मित्र कल्पनेतून साहेबांचे नवीन योद्धे तयार होतील व याचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच दिसेल असे ही ते म्हणाले.

या कार्यक्रम प्रसंगी पक्षाचे मा.नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, अजिंक्य पालकर,दीपक कामठे,ज्योती सूर्यवंशी,सिताराम तोंडे पाटील, प्रमोद शिंदे, अमोल गायकवाड, ऋतुजा देशमुख , किशोर शेडगे, नंदिनी पानेकर व आदी पदधिकारी/ मान्यवर उपस्थित होते.