आठवलेंची शिवसेनेला खुली ऑफर; पुन्हा आवळला युतीचा राग, म्हणाले…

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ३ पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सत्तेत आली. शिवसेने भाजप सोबत असलेली युती तोडली आणि भाजप-शिवसेनेचे रस्ते वेगळे झाले. असं असलं तरीदेखील भाजप-सेना युती होणार असल्याच्या चर्चा अधून-मधून सुरूच असतात. आता तत्कालीन महायुतीचे सदस्य असणाऱ्या आरपीआय (आ) चे अध्यक्ष अध्यक्ष आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा राग आवळला आहे.

मुख्यमंत्री पदाच्या वादावरून सेना-भाजपमध्ये दुरावा आला होता त्याच मुद्द्याला रामदास आठवले यांनी हात घालत पुन्हा या पक्षांची युती व्हावी असा मानस बोलून दाखवला आहे. ‘शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. त्यांनी भाजपसोबत यावं, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोनाविरोधात दंड थोपटावे. उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहेत. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. भाजपला विश्वास होता की, काँग्रेस पाठिंबा देणार नाही. मात्र, त्यांचा तो अंदाज चुकल्याचे त्यांनी सांगितले.