ठाकरे गटात इनकमिंग सुरूच; अजित दादांच्या गटातून आउटगोइंग झाली सुरु

पिंपरी चिंचवड : पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे.

शिवाजी मानकर

खेडचे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंना ठाकरेंनी शिवबंधनात बांधून घेतलं आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंना ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिलेत.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी