ठाण्यातून महायुतीचाच खासदार निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawankule: ठाणे लोकसभा मंतदारसंघ (Thale Loksabha) अद्यापि कुणी मागितलेला नाही किंवा तो कुणालाही दिला नाही. महायुतीच्या उमेदवाराला ५१% मतांनी निवडून आणण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने काम करेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर भाजपाचा केंद्रीय पार्लिमेंट्री बोर्ड आणि महायुतीचे (Mahayuti) महाराष्ट्रातील तिन्ही नेते निर्णय घेतील.

महाविजय 2024 अभियानांतर्गत राज्यव्यापी लोकसभा प्रवासात मंगळवारी (ता. १७) ठाणे लोकसभा क्षेत्रातील विविध संघटनात्मक कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सहभागी झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकादा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीमध्ये सर्व पक्ष काम करीत आहेत. भाजपाचे ६०० सुपर वॉरियर्स लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख घरोघरी पोहचून समर्थन मिळविणार आहेत. महाराष्ट्रातील ४५ हूनअधिक खासदार आणि २२५ पेक्षा अधिक आमदार महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

बावनकुळे यांनी ठाणे लोकसभा प्रवासात प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, विक्रांत पाटील, कोकण विभाग संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, ठाणे लोकसभा संयोजक, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आ. संजय केळकर, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, आ. गीता जैन, आ. ॲड. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, शहाराध्यक्ष ठाणे शहर संजय वाघुले, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, दीपक जाधव, मनोहर डुंबरे , ॲड. सुभास व्यास , संदीप लेले, शीतल भोईर, नरेंद्र मेहता, नम्रता कोळी, मनोज सुखदरे, सचिन पाटील, विकास घाग्रेकर, अशोक पाटील, विजय वाळुंज, सागर नाईक, संजीव नाईक, प्रकाश मोरे, प्रभाकर भोईर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन सर्वपक्षीय आंदोलन आहे. हे कुण्या पक्षाचे आंदोलन नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत समिती तयार करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले हा कायमस्वरूपी इतिहास झाला आहे. महायुती सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सुपर वॉरिअर्सशी संवाद, संपर्क से समर्थन
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ठाणे येथील आनंद नगर चेक नाका येथे मिरा-भाईंदर, ओवळा-माजीवाडा, कोपरी-पाचपाखाडी व ठाणे शहर आणि वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात बेलापूर व एरोली या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. ठाणे येथील जिल्हा परिषद कार्यालय ते गणपती मंदिरपर्यंत आणि वाशी येथे मराठा भवन ते एम.जे. कॉम्पलेक्स वाशी सेक्टर 17 पर्यंत ‘घर चलो अभियानात’ सहभागी होत जनतेशी संपर्क साधला व पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मागितले.यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधल्यावर नागरिकांना मोदी-मोदी असे नारे लावले, यामुळे संपूर्ण परिसर निनादला. यासोबतच त्यांनी नवदुर्गा मंडळांना भेटी दिल्या.

https://youtu.be/GNzisd4JIH4?si=gWjIzhUX0NFwy5O_

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार