पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत, पहा कुणी केला ‘हा’ दावा

Nilesh Rane  : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या घटनेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या तसेच पवारांच्या भूमिकेबाबत देखील उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. यानंतर बढाई मारण्याच्या नादात आपल्याच नेत्याला अडचणीत आणल्याचे लक्षात आल्यानंतर आता जयंत पाटील यांची दुसरी प्रतिक्रिया आली असून आता मात्र त्यांनी सारवासारव केली आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर प्रहार केला आहे. पहाटेचा शपथविधी जर पवार साहेबांची खेळी होती तर खासदार सुळे या कॅमेरासमोर ‘माझं घर तुटतंय’ सांगून का रडल्या?? फडणवीस साहेबांचा मनाचा मोठेपण आहे की त्यांनी अजित पवारांची इज्जत रस्त्यावर काढली नाही, ज्या दिवशी जगाला खरं कळेल पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत. असं राणे यांनी म्हटले आहे.